IMPIMP

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

by Team Deccan Express
Devendra Fadnavis targets Uddhav Thackeray, says - 'Maharashtra is beyond Mumbai Pune'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवार (दि.14) रात्री आठ पासून राज्यात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारकडून जाहीर कण्यात आलेल्या निर्बंध आणि आर्थिक मदतीवरुन देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचे फडणवीस Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे, ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, कडक निर्बंध लावणार असाल तर विविध घटकांना मदत केली पाहिजे. मात्र, सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज निव्वळ धुळफेक आहे. कारण 3300 कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली आहे. ती नियमित बजेटमधील तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे सध्या वाढणाऱ्या कोरोनासाठी ही तरतूद नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कोणाला कोणती मदत केली
सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार याची माहिती देईल असे वाटले होते. अनेक घटकांना सरकारने मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, लहान उद्योग कोणालाही कोणती मदत केलेली नाही. सरकारकडून दिशाभूल करण्यात आली आहे. वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त 1000 रुपये देईल असे वाटले होते. एकही नवीन पैसा मिळत नसून आगाऊ पैसा देत आहेत, असं म्हणत आदिवासींना दोन हजार रुपये खावटी अनुदान म्हणजेच तोंडाला पानं पुसण्यासारखं असल्याचे फडणवीस म्हणाले.

व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी
सरकारने पदविक्रेत्यांना मदत करणार असल्याचे सांगितले होते. नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग केवळ मुंबई आणि ठाण्यातील पदविक्रेत्यांना होणार आहे. तसेच रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे कोण येणार ? पार्सल सेवा देण्याची त्यांच्याकडे कोणती व्यवस्था आहे. असती तर त्यांनी हॉटेलच उघडले असतं. अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. याशिवाय ऑक्सिजनचे व्यवस्थापन करण्यात सरकारला अपयश आले असून त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई-पुण्याबाहेर महाराष्ट्र आहे
मुंबई आणि पुणे ही आपली प्रमुख शहरे आहेत. मात्र, मुंबई आणि पुणे शहराबाहेर देखील महाराष्ट्र आहे हे सरकारला माहीत नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणची व्यवस्था वाढवण्याच्या संदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. मागील वेळी नागपूरला कोणतीही व्यवस्था केली नाही आणि आजही केली नाही. नागपूरची व्यवस्था वाईट झाली असल्याने मी या ठिकाणी आलो आहे. शक्य हाेईल तितकी मदत मी याठिकाणी करणार आहे. पण सरकार कोणतीही मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची टीका फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली.

Read More : 

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

 

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Related Posts