IMPIMP

संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचा नंबर ? ; पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात ‘ही’ मागणी

by sikandershaikh
Pankaja Munde vs Dhananjay Munde | BJP leader pankaja munde slams NCP minister dhanajay munde after beed district nagar panchayat election result

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा नंबर धनंजय मुंडे (dhananjay munde) यांचा लागणार का?  हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून जोर धरू लागली आहे. आता धनंजय यांच्या भगिनी व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आज या मागणीचा पुनूरूच्चार करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांचा राजीनामा घेतला गेला यात आम्हाला पडायचे नसून राठोड आता मंत्रिपदावर नाहीत ही महत्त्वाची बाब आहे.तसेच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे केली जावी अशी आमची मागणी आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावर लक्ष ठेवावे, ही अपेक्षा आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसाच करुणा शर्मा आणि रेणू शर्मा
प्रकरणात धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे तसेच माझेही तेच मत असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस यंत्रणांवरील दबावाकडे बोट दाखवत पंकजा मुंडे यांनी एक महत्वाची मागणी केली आहे.
राजकारणात वावरत असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी यंत्रणा असायला हवी.
तशी स्पष्ट गरज सध्या दिसत आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.
सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दूरवस्था
आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही’, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे.

‘या’ 6 शहरांमध्ये होणार सामने ! ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्यांसाठी Bad News

Related Posts