IMPIMP

Dhananjay Munde | ‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde defeated kej nagar panchayat election congress forms alliance with bjp in beed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dhananjay Munde | भाजप नेत्या (BJP) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टिकेवरुन आता धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. यांनतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात अकरा वेळा ढगफुटी झाली आहे आणि तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. असं ते म्हणाले. त्यावेळी धनंजय मुंडे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, तुमची चांगली भावना असती तर मागच्या अतिवृष्टीत तुम्ही बांधावर दिसला असता. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेली आहे. मी येथील सर्व परिस्थिती कथन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. बीड जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बीडला सरसकट तातडीने मदत मिळावी अशी आमची मागणी केली आहे. असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी स्वत: पंकजा मुंडे या अमेरिकेत गायब झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

पु़ढे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, गेल्या काही दिवसात राज्यात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली.
या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो.
आम्ही रात्री अनेक लोकांना पुरातून बाहेर काढलेले आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या होत्या की, मदतीच्या आश्वासनाचे काय असा माझा प्रश्न असून पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले.
राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार आजी-आजोबा आहे. त्यामुळे केंद्राची मदत येईलच.
पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती.

Web Title :- Dhananjay Munde | social justice minister dhananjay munde criticizes bjp leader pankaja munde now

हे देखील वाचा :

Maharashtra Police News | पोलीस अधीक्षकांचा कारवाईचा बडगा ! कर्तव्यात कसूर करणाऱ्या 123 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Jayant Patil | ‘मी पुन्हा येईन’.. या वाक्यावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Maharashtra Rains | …म्हणून आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Related Posts