IMPIMP

नागपूरचे 4 ऑक्सिजन टँकर्स गुजरातला हलवले, हे देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही का? काँग्रेसचा सवाल

by nagesh
doesnt fadnavis see that 4 oxygen tankers from nagpur moved to gujarat question by congress

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात तिसरी लाट येण्याचा इशारा तज्जांनी दिला आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आणि भाजपात आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. नागपूरला येणारे ऑक्सिजन सिलेंडर गुजरातला पळवण्याचा डाव नुकताच उधळून लावण्यात आला आहे. यावरून कॉंग्रेसने (congress) परखड सवाल उपस्थित केला आहे. मोदी सरकारने देशातील भाजपाशासीत राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिलाय का? फडणवीसांना हे दिसत नाही का? असा सवाल काँग्रेसने congress फडणवीसांना विचारला आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजनला तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. पण कर्नाटकमधून येणारा ऑक्सिजनचा साठा केंद्राने थांबवला आहे. ही बातमी ताजी असताना नागपूरला जाणारे ऑक्सिजनचे सिलेंडर हे गुजरातला पळवण्यात येत होते. अधिकची रक्कम मिळाल्याने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीने परस्पर हे टॅंकर अहमदाबादला वळवले होते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान काल पश्चिम महाराष्ट्राचे टॅंकर्स कर्नाटक सरकारने रोखले. त्यानंतर नागपुरचे ऑक्सिजन टॅंकर्स गुजरातला नेण्याचा डाव उघडकीस आला. त्यामुळे ही बाब फडणवीसांना दिसत नाही, का अशी विचारणा कॉंग्रेसने congress केली आहे.

Also Read :

‘महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही’

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

Related Posts