IMPIMP

अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स ! ED आज काय पाऊल उचलणार?, चर्चेला उधाण

by bali123
ed summons ex maharashtra home Minister anil deshmukh in money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED summons | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केल्यानंतर आता अनिल देशमुख यांना ईडीने समन्स (ED summons) बजावले आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे. ed summons ex maharashtra home Minister anil deshmukh in money laundering case

अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या दोघांची काल चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याचबरोबर अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स (summons) बजावण्यात आले. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास आणखी घट्ट करण्यात येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनिल देशमुख (anil deshmukh) हे सध्या मुंबईतच आहेत. त्यामुळे ते चौकशीला हजर राहणार का हे काही वेळातच समजणार असून त्यानंतर त्यांची चौकशी काही तास सुरु राहण्याची शक्यता आहे. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देणार की त्यांना अटक होणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकणार आहे.

Web Titel : ed summons ex maharashtra home Minister anil deshmukh in money laundering case

Related Posts