IMPIMP

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

by pranjalishirish
Eknath khadse informed court about action ed due change party

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ED) माझ्या मागे लागले. पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ईडीने चौकशी सुरू केली. असा युक्तीवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे  Eknath Khadse यांच्यातर्फे मंगळवारी (दि.30) मुंबई उच्च उन्यायालयात करण्यात आला.

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भोसरी भूखंड प्रकरणी 2016 मध्ये तक्रार नोंदविली आणि 2018 मध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. पक्ष बदलल्यावर ईडीने अचानक या प्रकरणात हस्तक्षेप सुरु केला. त्यामुळे त्यांच्या समन्स पासून संरक्षण मिळावे, असा युक्तीवाद खडसे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे केला. खडसे Eknath Khadse यांच्याविरोधात आर्थिक गुनह्यासंदर्भात केस केली आहे. त्यात जामिनावर सुटकेची तरतूद नाही. तसेच खडसे यांना अनेक आजार असल्याने त्यांना नियमित रुग्णालयात दाखल व्हावे लागते, असा युक्तीवाद अॅड. आबाद पोंडा यांनी केला.

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

एकनाथ खडसे Eknath Khadse  यांच्यातर्फे त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, खडसेंना ईडीने डिसेंबर 2020 मध्ये समन्स बजावले. त्यांनी राजकीय पक्ष बदलल्यावर जून 2020 मध्ये ईडीने गुन्ह्याची नोंद केली. तक्रार 2016 मधील आहे. समन्स नंतर बजावले, असा युक्तीवाद पोंडा यांनी केला.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

Related Posts