IMPIMP

Eknath Khadse । ‘कुछ तो होने वाला है’, असे मेसेज जळगावात फिरतायत’

by bali123
Eknath Khadse | eknath khadse statement on ed cbi cid acb raid on opposition leaders treat like enemy

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Bhosari land scam) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी अटक केली आहे. यावरून आज खडसे यांची पत्रकार परिषद होणार होती मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे होणारी पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती दिली होती. तर खडसे (Eknath Khadse) आज चौकशीसाठी ED कार्यालयात उपस्थित राहणार का? असा सवाल समोर येत होता, मात्र, ते ED कार्यालयात जात असल्याचं खडसे यांनी माध्यमांना सांगितलं आहे. आणि ते ED कार्यालयात पोहचले देखील आहेत.

खडसे यांच्या जावयाला अटक केलीय त्यांना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली असल्याने या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे म्हणाले, आपण ED ला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. पण, मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. MIDC ने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असं सांगितल्यास मी दोषीच असेन. ‘कुछ तो होने वाला है’, असे मेसेज जळगावात फिरताहेत. पाचच वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा काढले, मला अडकविण्याच प्रयत्न असल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलाय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एकनाथ खडसे म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली.
हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. म्हणून यात राजकीय हेतू असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान.
फडणवीस सरकारमध्ये (Fadnavis Government) एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे 3.1 एकर भूखंड खडसे यांची पत्नी आणि जावयाच्या नावे खरेदी केली होती.
31 कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता.
त्यांच्याकडून MIDC ने 1971 साली अधिग्रहण केला होता, मात्र, उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे.

Web Titel :- eknath khadse sick eknath khadse came eds office said political smell

Related Posts