मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Election Commission | ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यानंतर राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे कारण देत ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्याबाबतचे पत्र ठाकरे सरकारने (Thackeray government) निवडणूक आयोगा (Election Commission) कडे दिले होते. मात्र या पत्राला निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. राज्यातील 5 जिल्हा परिषद (Zilla Parishad) अन् त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील (Panchayat Samiti) रद्द झालेल्या पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून 19 जुलै रोजीच होईल, असे उत्तर राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान (Election Commissioner U. P. S. Madan) यांनी शुक्रवारी (दि. 25) राज्य शासनाला (State Government) दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक रोखण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. Election Commission | bypoll without obc reserved seats be held election commission letter state government
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
निवडणूक आयोगाने राज्य शासनाला (State government) लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक घेणे अपरिहार्य असून ती टाळताच येणार नाही. लेव्हल एकमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्येच पोटनिवडणूक आम्ही घेत आहोत. लेव्हल 3 मध्ये असलेल्या पालघर जिल्ह्यात निवडणूक घेणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे आता नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातील पोटनिवडणूक अटळ आहे. ओबीसींचे आरक्षण (OBC reservation) बहाल केले जात नाही तोवर कोणतीही पोटनिवडणूक घेऊ नये, अशी मागणी राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती.
त्यानंतर सरकारने निवडणूक पुढे ढकलण्याचे पत्र आयोगाला दिले होते.
मात्र निवडणूक आयोगाने पोटनिवडणून घेणे अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे.
Web Title :- Election Commission | bypoll without obc reserved seats be held election commission letter state government
- Ed Raids on Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास
- amarnath yatra | कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द
- Atal Pension Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दर महिना मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ
- Raj Thackeray | ‘नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव द्या, मग बघू कोण आडवतंय’
- ncp sharad pawar | शरद पवारांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण
- bjp leader devendra fadanvis | भाजपचा पुन्हा शिवसेनेसोबत जाण्यासाठी नकार? माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानानं नवी चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…