IMPIMP

Rohit Pawar : ‘लॉकडाऊन काळातील MPSC परीक्षेबाबत स्पष्टीकरण द्या’

by pranjalishirish
explain about mpsc exam during lockdown direct question rohit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  Rohit Pawar यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

दरम्यान, एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मात्र, आता तेच विद्यार्थी 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा झाल्या तर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून होत आहे. परंतु अद्याप सरकारकडून यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याची मागणी रोहित पवार Rohit Pawar  यांनी केली आहे.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

रोहित पवार Rohit Pawar यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘लॉकडाऊन’ असताना रविवार (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. आता सरकार कोणता निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. सरकारने याची दखल घेत 21 मार्च रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. ही परीक्षा वेळेत झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts