IMPIMP

‘गड आला, पण सिंह गेला’ ! औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा धक्कादायक पराभव

by pranjalishirish
former assembly speaker Haribhau Bagade loses district bank election abdul sattar ambadas danve won

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन-  औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक व विधानसभेचे माजी सभापती आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे Haribhau Bagade  यांचा पराभव झाला आहे. संचालकपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनेलने 20 पैकी 14 जागा जिंकून बाजी मारली. बागडे हेच शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख नेते होते, त्यांचाच पराभव झाला आहे. या पॅनेलचे 14 उमेदवार विजयी झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

हरिभाऊ बागडे  Haribhau Bagadeयांचा पराभव झाल्यानंतर या पॅनेलचे बिनविरोध निवडून आलेले रोहयोमंत्री संदीपान भुमरे व प्रोसेसिंग मतदारसंघातून निवडून आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया दिली आहे. बिगर शेती मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान चेअरमन नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे हे निवडून आले आहेत. सतीश चव्हाण आणि अंबादास दानवे यांनी पहिल्यांदाच बँकेची निवडणूक लढवली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलचे जगन्नाथ काळे व अपक्ष अभिषेक जैस्वाल यांनी बिगर शेती मतदारसंघातून बाजी मारली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हरिभाऊ बागडे  Haribhau Bagade यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले होते. शेतकरी विकास पॅनेलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभवच सर्वांच्या जिव्हारी लागला आहे.

Also Read :

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts