IMPIMP

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

by pranjalishirish
former chief minister farooq abdullah corona tested positive vaccine

श्रीनगर : वृत्तसंस्था- देशात करोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यातच लोकप्रतिनिधी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच काही लोकप्रतिनिधींनी कोरोनाचा पहिला डोस घेऊन देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने संबंधित लस प्रभावी आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्ला Farooq Abdullah  यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याच महिन्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

फारुख अब्दुल्ला  Farooq Abdullah यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन दिली आहे. तसेच, जोपर्यंत कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्य विलगीकरणात राहतील, असेही ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

ओमर अब्दुल्ला Farooq Abdullah  यांनी ट्विट करुन म्हटले आहे, माझे वडिल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत आम्ही कोरोना चाचणी करत नाही, तोपर्यंत आम्ही कुटुंबातील इतर सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. तसेच, गेल्या काही दिवसांत आमच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

Related Posts