IMPIMP

Former Home Minister Anil Deshmukh | होय, ‘कुंदन शिंदेनं 4 कोटी रूपये अनिल देशमुखांना दिले’; सचिन वाझेच्या जबाबातून धक्कादायक खुलासा

by bali123
Former Home Minister Anil Deshmukh | sachin waze made big revelation in anil deshmukh money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या घरांवर कालच सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. त्यानंतर ईडीनं (ED) अनेक विविध ठिकाणावर छापा टाकत बार मालकांचाही जबाब नोंदवून घेतला. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिलीय. यानंतर ईडी अधिकाऱ्यांना मिळालेल्या धागेदोरेनुसार त्यांनी देशमुख (Anil Deshmukh) यांचे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे ( Kundan Shinde and Sanjeev Palande ) या दोन स्वीय सहाय्यकांना अटक केलीय. तर आता सचिन वाझेनं (Sachin Waze) आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Former Home Minister Anil Deshmukh | sachin waze made big revelation in anil deshmukh money laundering case

सचिन वाझेंनी (Sachin Waze) आपल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार की,
4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले होते. तर सचिन वाझेने हेच पैसे कुंदन शिंदेला दिले.
आणि कुंदन शिंदेने हे पैसे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना दिले असा एक मोठा खुलासा सचिन वाझेनं त्याच्या जबाबात केल्याचे ईडीच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान आजच कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला
मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे.
तर ईडीच्या बाजून वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून
त्यांनी दोघांची 7 दिवसांची ईडी कोठडीची मागणी केलीय.

ED च्या वकिलांनी दिलेली माहिती..

मुंबई हाय कोर्टात 3 जनहित याचिका दाखल दाखल केल्या असून या याचिकेवर दिलेल्या आदेशावर CBI ने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे. तर PMLA कायदा -50 नुसार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जबाब ED ने नोंदवला आहे. याच कायद्यांतर्गत बरोबर आणखी ही काही जणांचे जबाब इडीने (ED) नोंदवले आहेत.
तर CBI ने दाखल केलेल्या एफआरआय अंतर्गत ईडीने ईसीआर नोंदविला केला आहे.
ईडीचा (ED) ईसीआर हे सार्वजनिक दस्तऐवज नसतात. ईसीआर दाखल केल्यानंतर आम्ही चौकशी करता आरोपींना समन्स केले होते. संजीव पालांडे हा देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहेत
तर कुंदन पालांडे हा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा असिस्टंट आहे.
बार मालकांकडून पैसे काढायचे असा आरोप यांच्यावर आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वकिलांनी न्यायालयात (COURT) केलेल्या दाव्यानुसार म्हटलं आहे की, सचिन वाझेने (Sachin Waze) डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये गुडलक म्हणून देशमुख यांचा स्वीय सहाय्यक संजीव पालांडेला दिले होते. मुंबई पोलीस परिमंडळ एकूण बारा ठिकाणातून मिळून सचिन वाझेनं (Sachin Waze) 4 कोटी 80 लाख रुपये गोळा केले.
आणि 60 बार मालकांकडून पैसे वसूल केले होते. तर रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवण्याकरता हे पैसे गोळा केले होते. तसेच, जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे.
सचिन वाझेने (Sachin Waze) त्याच्या जबाबात यांचा उल्लेख केला आहे.
ACP संजय पाटील आणि एक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना सचिन वाझेने सांगितले
की अनिल देशमुख यांचे PA संजीव पालांडे यांनी त्याला बार मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले आहे.

या दरम्यान, ईडीचे (ED) वकील सुनिल गोंसावलीस यांनी पूढे म्हंटल की,
कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना PMLA कायदा अंतर्गत अटक केलीय.
यांची अजून चौकशी करणे बाकी आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे
या बाबत चौकशी करायची आहे असं (ED) चे वकील सुनिला गोंसावलीस यांनी न्यायालयाला सांगितलं आहे.

Web Title : Former Home Minister Anil Deshmukh | sachin waze made big revelation in anil deshmukh money laundering case

Related Posts