IMPIMP

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुले देखील चौकशीच्या कक्षेत; CBI कधीही करू शकते मोठी कारवाई

by nagesh
Anil Deshmukh | cbi team with arrest warrant of salil deshmukh reached anil deshmukh nagpur home

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर हायकोर्टच्या निर्देशावर सीबीआय प्राथमिक तपास करून अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा आणि पदाच्या दुरुपयोगाचे प्रकरण नोंदवून तपास करत आहे. सीबीआयच्या चौकशीची कक्षा केवळ अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांपुरती मर्यादित नाही तर देशमुख यांच्या मुलांच्या कंपन्या आणि त्यामध्ये गुंतवणूक सुद्धा चौकशीच्या फेर्‍यात आहे.

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

सीबीआय सूत्रांनुसार, अनिल देशमुख anil deshmukh यांची दोन मुले सलिल देशमुख आणि हृषिकेश देशमुख यांच्या मालकीच्या अर्धा डझनपेक्षा जास्त फर्मपैकी एक कोलकाताची कंपनी आहे जी सीबीआयच्या तपासाच्या कक्षेत आली आहे. सूत्रांनुसार, कोलकाताची कंपनी एका अशा पत्त्यावर सुरू आहे जो शेल कंपन्यांचा एक हॉटस्पॉट आहे. सीबीआय सूत्रांनुसार देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख आणि हृषिकेश देशमुख यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या आर्थिक नोंदीची चौकशी केली जात आहे, ज्यामध्ये कोलकाता येथील झोडियाक डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेडचा सुद्धा समावेश आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी केंद्राला करुन दिली ‘त्या’ कलमांची आठवण, तत्परतेने निर्णय घेण्याची मागणी

शेल कंपन्यांचा हॉटस्पॉट
सीबीआय सूत्रांनी सांगितले की, झोडियाक डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेडचा नोंदणीकृत पत्ता, 9/12 लाल बाजार, ब्लॉक ई, सेकंड फ्लोअर, कोलकाता आहे. ही एक ब्रिटीश काळातील इमारत आहे, ज्यास मर्केंटाईल बिल्डिंग म्हटले जाते. ती 2017 मध्ये केंद्र सरकारद्वारे शेल कंपन्या आणि काळापैशावरील कारवाई दरम्यान नियुक्त टास्क फोर्सला 400 पेक्षा जास्त शेल कंपन्यांचा हॉटस्पॉट असल्याचे आढळून आले होते.

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

मात्र, नंतर यापैकी काही शेल कंपन्या कॉर्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालयाने बंद केल्या होत्या. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) चा रेकॉर्ड सांगतो की, त्यापैकी 100 पैकी जास्त अजूनही एकाच इमारतीमध्ये सक्रिय आहेत. यापैकी कमीत कमी 30 सक्रिय फर्मकडे झोडियाक डीलकॉम सारख्याच समान पत्त्यावर आपले नोंदणीकृत कार्यालय आहे. रेकॉर्डवरून समजते की, मार्च 2019 पर्यंत, झोडियाक डीलकॉमची मालकी चार फर्म- आयती जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, काँक्रीट रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक विस्टा रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि काँक्रीट एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड सलिल देशमुख, ऋषिकेश देशमुख आणि देशमुख कुटुंबाच्या सदस्यांकडे होती. या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार संशयाच्या फेर्‍यात आहेत.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

सीबीआय अनिल देशमुख anil deshmukh यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे, ज्यांच्यावर कथित प्रकारे सार्वजनिक कर्तव्यात अनुचित प्रकार आणि पदाच्या दुरुपयोगाचा आरोप आहे. एजन्सी देशमुख यांच्याद्वारे बदली करणे, राज्यात पोलीस अधिकार्‍यांचे पोस्टींग आणि अधिकार्‍यांच्या कामगिरीला प्रभावित करण्याचा आरोपाची चौकशी करत आहे. सीबीआयद्वारे अनिल देशमुख यांच्या मुलांच्या कंपन्यांच्या चौकशी बाबत अनिल देशमुख किंवा त्यांच्या मुलांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. अनिल देशमुख, सलिल देशमुख किंवा हृषिकेश देशमुख यांची प्रतिक्रिया मिळताच त्यांची बाजू सुद्धा मांडली जाईल.

Also Read :

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

Related Posts