माजी आमदार, ज्येष्ठ समाजसेवक अॅड. एकनाथराव साळवे यांचे निधन
चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजसेवक अॅड. एकनाथराव साळवे eknath salve यांचे आज (शनिवार) दुपारी दीडच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, एक मुलगा, 3 मुली, सून, नातू, जावई व मोठा आप्त परिवार आहे. अॅड. साळवे eknath salve यांच्या पार्थिवावर उद्या (ता.14) बामणी येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
एकनाथराव साळवे eknath salve यांचा जन्म 30 मार्च, 1930 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. बीए., एलएलबीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले होते. नागपुरात कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांच्याशी मैत्री झाली होती. पण ते नागपूरमध्ये न राहता चंद्रपुरात राहिले. तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. एकनाथराव साळवे हे बामणी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिव्हिल लाइन प्रभागात मुलगा अॅड. जयंत साळवे यांच्यासोबत राहत होते.
1967 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने एकनाथराव यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी ते बहुमताने विजयी झाले होते. त्यानंतर 1972 मध्ये आमदार म्हणून विजयी झाले. 1978 मध्ये विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राची हानी : मुनगंटीवार
अॅड. साळवे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दु:ख व्यक्त केले. अॅड. साळवे यांच्या निधनाने ध्येयवादी नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली, असे ते म्हणाले.
रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात
MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’
21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा
बदलीनंतर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘क्राइम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो’
Comments are closed.