IMPIMP

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

by Team Deccan Express
Raju Shetti | swabhimani shetkari saghtana leader raju shetti claims maharashtra goverment minister take bribe from goverment servant

शिरोळ : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, बहुतांश व्यवहार बंद आहेत. त्यातच गोकुळ दूध संघाची निवडणूक होत आहे. मात्र, या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी raju shetti यांनी केला आहे. तसेच घटनेप्रमाणे सामान्य माणसाला जो नियम आहे, तोच नियम राज्यकर्त्यांनाही लागू आहे, असेही ते म्हणाले.

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी नृसिंहवाडी येथे प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात मोठी गर्दी झाली होती. यावरून राजू शेट्टी raju shetti यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात अशी गर्दी गोळा करणे याचा नेमका अर्थ काय? आतापर्यंत गोकुळच्या दोन ठरावधारकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर एक जण अत्यवस्थ आहे. याचाही विचार होणे आवश्यक आहे. जबाबदार म्हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजनची तुटवडा दूर करून नागरिकांना दिलासा देणे आणि सर्वसामान्यांचा बचाव करण्याची ही वेळ आहे. कोरोना नियम कशासाठी? गोकुळच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

दरम्यान, जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात दोन दिवसांपुर्वी ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. यामध्ये 40 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध मिळणार की नाही, या भीतीने सर्व हैरान झाले होते. मात्र, त्यावेळी राजू शेट्टी raju shetti यांनी आवाज उठवल्यावर संबंधित रुग्णालयाला ऑक्सिजनची सोय करून देण्यात आली.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts