IMPIMP

Gautam Gambhir | ‘आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच…’ गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला (व्हिडिओ)

by bali123
Gautam Gambhir | Send ur son or daughter to the border & then call a terrorist state head ur big brother! Gautam Gambhir to Navjot Singh Sidhu-pakistan army general kmar javed bajwa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्यामुळे टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) आमने- सामने आले आहेत. काही दिवसांपूर्वी नवजोत सिंग सिद्धू यांनी इम्रान हे माझे मोठे भाऊ असल्याचा दावा केला होता. त्यावरून गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेप घेतला. तसेच त्याचा संबंध भारत-पाकिस्तान (India- Pakistan) यांच्यातील संबंध आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीशी जोडला गेला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

भाजपा (BJP) नेते अमित मालवीय (BJP Leader Amit Malviya) यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे अधिकारी नवजोत सिद्धूचे जोरदार स्वागत करत आहेत. सिद्ध पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दरबार साहिब गुरुद्धावारात (Darbar Sahib Gurdwara) दर्शन घ्यायला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी नवजोत सिंग सिद्धू यांनी ‘इम्रान खान माझे मोठे भाऊ आहेत, त्यांना खूप प्रेम’, असे वक्तव्य केले. अमित मालवीय यांनी या व्हिडिओला कॅप्शन देत ‘राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आवडते नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तनच्या पंतप्रधानांना मोठा भाऊ असल्याचं म्हटंल आहे.

नवजोत यांनी पाकिस्तानतचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (pakistan army general kmar javed bajwa) यांची मागच्यावेळी गळाभेट घेतली होती. त्याचीसुद्धा बरीच प्रशंसा झाली.
यानंतर आता माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने यासंदर्भात ट्विट केले.
त्या ट्विटमध्ये ‘तुमचा मुलगा किंवा मुलीला बॉर्डरवर पाठव.
त्यानंतरच एखाद्या दहशतवादी देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणं.’
या ट्विटमध्ये गंभीरनं कुणाचंही नाव घेतलेले नसले तरी त्याचा इशारा सिद्धूकडे असल्याचे समजत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण आहेत. याचा परिणाम क्रिकेटवरही (Cricket) झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट सीरिज झालेली नाही. हे दोन्ही देशांच्या टीम फक्त आयसीसीच्या (ICC) स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच (Asia Cup) एकमेकांच्या समोर येतात.

Web Title :- Gautam Gambhir | Send ur son or daughter to the border & then call a terrorist state head ur big brother! Gautam Gambhir to Navjot Singh Sidhu-pakistan army general kmar javed bajwa

Related Posts