IMPIMP

Girish Mahajan | गिरीश महाजन यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले – ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात’

by nagesh
Girish Mahajan | need to investigate eknath khadse son death whether it was murder or suicide says girish mahajan

जळगाव :  सरकारसत्ता ऑनलाइन – Girish Mahajan | जळगाव जिल्ह्यात (Jalgaon News) वेगळंच राजकारण ढवळून निघालं असल्याचं चित्र समोर दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे (BJP) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून महाजन आणि खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं भाष्य केलं होतं. यानंतर आता गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत,’ अशी टीका महाजन यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काही वृत्तपत्रांशी फोनवर बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीने कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना एकनाथ खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते.
गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल (रविवारी) उत्तर दिलं आहे.
‘आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे,’
अशा शब्दात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय,’ असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे.
‘खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करतायेत, असा आरोप देखील गिरीश महाजन यांनी केला आहे.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Girish Mahajan | girish mahajan gave answer to eknath khadse on statement made by khadse against him

हे देखील वाचा :

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Trupti Desai | सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

KVP Interest Rate Change | ‘किसान विकास पत्र’चे (KVP) नवीन व्याजदर घोषित, जाणून घ्या आता किती आहे नवीन व्याजदर

Related Posts