IMPIMP

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

by Team Deccan Express
Girish Mahajan | girish mahajan gave answer to eknath khadse on statement made by khadse against him

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – जळगावमध्ये मागील दोन दिवसांपासून जामनेर तालुक्यातील वाकोद जवळ असलेल्या वडगाव बुद्रुक येथील एका तरुणाने एकनाथ खडसे यांना केलेल्या मोबाईल कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. तरुणाने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर दोघांमध्ये झालेल्या संवादाने चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘आमदार काय करतोय…? बायकांमागे फिरतोय नुसता..!’ व ‘गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो’ असे संवाद कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहेत. मात्र ही ऑडिओ क्लिप किंवा त्यामधील आवाज हा एकनाथ खडसेंचा आहे का याची निश्चित खातरजमा अद्याप झालेले नाही. मात्र, यावरुन गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर चांगलेच तोंडसुख घेतलं आहे. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत रहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असे म्हणत गिरीश महाजन girish mahajan यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

देशानंही ‘महाराष्ट्र मॉडेल’ व मुख्यमंत्र्यांसारखं काम करावं : खा. संजय राऊत

ते सध्या वेगळ्या मनस्थितीत आहेत
गिरीश महाजन girish mahajan यांनी एकनाथ खडसेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. त्यांनी अतिशय अश्लिल भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यात खडसे साहेबांचा दोष नाहीये. मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत रहावं. लोकांना कोण काय आहे हे सगळं माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळालेली नाही. लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघात नाकरलेलं आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

RSS स्वयंसेवकाने स्वत:चा बेड त्याग करत दिला दुसऱ्याला म्हटले, ‘मी जीवन जगलोय…

काय आहे ऑडीओ क्लिपमधील संवाद ?
जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रुक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का, असे म्हटले. त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन girish mahajan आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे तो गिरीश फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts