IMPIMP

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

by Team Deccan Express
gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi in pandharpur by election rally

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर gopichand padalkar आज ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. या सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पांढऱ्या पायाचे आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर gopichand padalkar आज पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. प्रचारसभेतील भाषणाच्या सुरुवातीलाच पडळकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. आमचा भगिरथ भालकेंना विरोध नाही. तर राज्यातील आघाडी सरकारला आहे. हे सरकार विश्वासघाताने आले आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

तसेच पुढे म्हटले, की ‘गेल्या दोन महिन्यात टीव्हीवर या सरकारच्या काळ्याधंद्यांच्या बातम्यांशिवाय एकही बातमी दिसत नाही. राज्यातील सरकार हे बलात्कारी सरकार आहे. गुन्हेगारांचे सरकार आहे. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. या सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पांढऱ्या पायाचे आहे.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

सरकारने जुनी दारू टाकली नव्या बाटलीत
ठाकरे सरकारकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होत्या. हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे सरकार देईल असे वाटत होते. मात्र, या सरकारने काहीच दिले नाही. जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्यासारख्या दाखवल्या. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले.

Read More : 

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts