IMPIMP

Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा …’ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

by nagesh
Gopichand Padalkar | maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि पवार कुटुंबियांवर नेहमीच निशाणा साधत असतात. आता ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation Maharashtra) मुद्यावरुन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवार कुटुंबियांवर (Pawar Family) जहरी टीका केली आहे. पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा घराणेशाहीला वैतागून लोकांनी उद्रेक केला तर तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल अशी टीका केली आहे. जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल असेही पडळकर यांनी म्हटले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाची हत्या पवार यांनीच केली. आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरु असून ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप त्यांनी केला.

पवार कुटुंबियांवर टीका करताना पडळकर म्हणाले, पवार घारण्याला महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही त्या संस्कृतीचे राहिलेले नाहीत. पवारांनी संस्कार व संस्कृती वर बोलू नये जर महाराष्ट्र (Maharashtra) पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. तुमच्याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर येतील असे पडळकर म्हणाले.

काँग्रेस (Congress) ही फक्त वसुली करण्यात मशगुल आहेत. इकडे ओबीसी आरक्षण गेले असताना तिकडे त्यांचे मंत्री फॉरेनला गेले आहेत. काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा येथे राज गादी मिळाली आहे, झोपायला बंगले मिळाले आहेत, अशा शब्दात पडळकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

Web Title : Gopichand Padalkar | bjp gopichand padalkar criticised ncp sharad pawar

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

LPG Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या

Pune Municipal Election 2022 | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर; जाणून घ्या नावे

Maharashtra Monsoon Updates | आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार – IMD

Shirdi Airport | शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार – व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

Related Posts