IMPIMP

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

by nagesh
Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gopichand Padalkar | मागील दोन महिन्यापासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह कृती समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं. मात्र, MSRTC कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहेत. यानंतर आता भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मंत्री अनिल परब यांना आव्हान दिलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून सर्वजण दरवाजे ठोठावत आहेत. त्यापेक्षा अनिल परब
यांनी स्वतः आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी (ST Workers) चर्चा का करत नाहीत ? त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः भेटावं आणि बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल, असं आश्वासित करावं. त्यामुळे चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले होते की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला सामोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा. त्यांच्यासोबत चर्चा करा आणि यावर तोडगा काढा,’ असं आव्हानच त्यांनी अनिल परब यांना दिलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच, ‘एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसुलात घट आणली. त्यामुळेच शरद पवारांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

Web Title : Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC

हे देखील वाचा :

Cryptocurrency Miracles-Changpeng Zhao | बर्गर बनवणाऱ्याने आपले घर विकून क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले, आता मार्क झुकरबर्गपेक्षा ‘श्रीमंत’

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या ‘स्पीड’ आणि ‘चार्जेस’

Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात; डॉक्टरसह चौघांवर FIR

Related Posts