IMPIMP

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांना 2 दिवसांचा वेळ मिळणार ?, विजय वडेट्टीवार म्हणाले…

by pranjalishirish
government will give two days before implementation of strict lockdown says vijay wadettiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून विरोधाची भूमिका घेतली जात आहे. त्यावरून राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. संकटाच्या या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये, असे ते म्हणाले.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या वाढतच आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने सरकारकडून पावले उचलली जात आहेत. पण व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. त्यावर वडेट्टीवार Vijay Wadettiwar म्हणाले, ‘व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. संकटाच्या या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी अचानक लॉकडाऊन लावला. अजिबात सवड दिली नाही. त्यावेळी तो निर्णय कोणताही विरोध न करता मान्य केला. त्यावेळी ती गरज होती, तशी आजही आहे’.

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

तसेच लोकांना किमान वेळ दिला जावा असे सर्वांचेच मत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाऊन नेमका कसा असेल ? त्यात नेमके काय निर्बंध असतील ? काय सवलती असतील ? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आज किंवा उद्या घोषणा करतील, असेही वडेट्टीवार Vijay Wadettiwar म्हणाले.

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

कोरोनाचा सध्याचा स्ट्रेन अतिशय घातक

राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान 14 दिवसांचा असावा असे सगळ्यांचे मत आहे. कोरोनाचा सध्याचा स्ट्रेन अतिशय घातक आहे. त्याचा संसर्गाचा वेग भयानक आहे. बाधित रुग्ण तीन-चार दिवसांत अत्यवस्थ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांना वेळेवर उपचार दिले नाही तर त्यांचा मृत्यू ओढवतो, असेही ते म्हणाले.

Read More : 

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts