IMPIMP

पडळकर-खोत म्हणतात – ‘सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन…’

by Team Deccan Express
guardian minister of sangli not working said padalkar and khot in sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच सांगली sangli जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. ‘सांगली sangli जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. पालकमंत्री निष्क्रिय आहेत, तर राज्य शासन कुचकामी ठरले आहे, असे म्हटले आहे.

Pravin Darekar : ‘आतातरी राजकारण थांबवा, लसीकरण निश्चित वेळेतच व्हायला हवं’

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मिरज येथील शासकीय रुग्णालयात आणखी बेड्सची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी भाजपची जिरवायची या उद्देशाने सत्ता मिळवली. मात्र, महाविकास आघाडी ही जनतेची जिरवत आहे. राजकारण बाजूला ठेवून कोरोनाच्या संकटातून सत्ताधाऱ्यांनी जनतेला बाहेर काढावे. पालकमंत्र्यांनी सांगली sangli जिल्ह्यात तळ ठोकून बसून येथील परिस्थिती हाताळणे गरजेचे होते. मात्र, विरोधी आमदारांची खिल्ली उडवायची आणि त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. यामुळेच सांगलीतील sangli परिस्थिती गंभीर बनली आहे’.

Coronavirus : कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्यात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…

तसेच एक वर्षापूर्वी विरोधी आमदारांनी ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट उभा करण्याची मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केले. आता जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. महात्मा फुले योजनेतून उपचार केले जात असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी. रेमडेसिव्हिरही मागणीप्रमाणे मिळत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Also Read :

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Related Posts