IMPIMP

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार, करणार 100 कोटीचा दावा

by nagesh
Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya on hasan mushrif home ed raid

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत 11 नेत्यांची नावे सांगितली. मुश्रीफ यांच्यावर आरोप करत 2700 पानांचा पुरवा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. यानंतर आता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पलटवार केला आहे. आजपर्यंत मी 50-50 कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी (Defamation) झाली. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा कोल्हापूर सत्र न्यायालयात (Kolhapur Sessions Court) करणार असल्याचे सांगत आम्ही भाजपसारखे (BJP) चिक्की घोटाळे केले नाहीत असा टोला लगावला आहे.

मुश्रीफ म्हणाले, मला माहिती होतं, कधी ना कधी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जातील.
सोमय्यांनी 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप (scam Allegations) केला आहे.
गेल्या 17 वर्षापासून मी राजकारणात आहे. माझ्यावर कोणी आरोप केला नाही.
सोमय्यांचा मनापासून तिव्र निषेध करतो. त्यांनी जे कागदपत्रे दाखवली ते सर्व संकेतस्थळावर
उपलब्ध आहेत.
निवडणुकीमध्ये कागदपत्र आपण दाखल करतो ते उपलब्ध असतात.
त्यांनी विशेष काहीही केले नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोमय्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरावर धाड टाकली होती.
सर्व निवासस्थानावर धाड टाकली. त्यामध्ये काहीच आढळले नाही.
कारखान्यामध्ये त्यांना काही संशय होता. ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
धाड टाकून अडीच वर्षे झाली परंतु त्यात अद्याप काहीच कारवाई झाली नाही.
त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. आता किरीट सोमय्या यांनी बेनामी आहे.
मनीलाँडरींग आहे, असा शोध कोठून लावला ? कदाचित सोमय्या या बिचाऱ्यांना काही माहती नसावी.
वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि समरजीत घाटगे (Samarjit Ghatge)
यांनी सोमय्या यांना माहिती दिली असावी.
त्यामुळे त्यांनी हे आरोप केले असावेत.
त्यांनी कागलला येऊन माहिती घ्याला पाहिजे होती, असेही मुश्रीफ म्हणाले.

तेव्हा मी सोमय्यांना हार घालेन

विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, अस वक्तव्य सोमय्या यांनी करु नये.
गोरगरीबांना राष्ट्रीय तपास संस्थांच्या (National Investigation Agency) आशा कारवायांमुळे फार चीड आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या पराभवाला किरीट सोमय्या जबाबदार ठरतील.
जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा मी किरीट सोमय्या यांना हार घालेन, असे मुश्रीफ म्हणाले.

Web Title : Hasan Mushrif | hasan mushrif replied to kirit somaiya on scam accusing

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; ED कडे अधिकृत तक्रार करणार – किरीट सोमय्या

Pune MNS | ‘बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक (व्हिडिओ)

High Court | अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हा देखील बलात्कारच – हायकोर्ट

Related Posts