IMPIMP

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

by omkar
Hasan Mushriff

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अन् सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते.
मात्र, त्यापूर्वीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिल्याने ते लंडनला जाऊन बसल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी केला आहे. महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लस आपल्याला दिली जात नाही.

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

एकीकडे राज्यांना लसीकरण करायला सांगायचे अन् दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान येत्या 2 दिवसांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी सांगितले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली होती.
त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचे त्यांनी ठरवले होते.
मात्र त्यानंतर दुस-याच दिवशी मोदी सरकारने तंबी दिल्याने पुनावाला लंडनमध्ये जाऊन बसले. कोरोना लसींच सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची गरज आहे.
मात्र 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केंद्र सरकार करणार आणि 18-44 वयोगटातील राज्य सरकारने करावे असे सांगत आहेत, हे चुकीचे आहे. 18 वर्षावरील वयोगटाला लस देण्यासाठी केंद्राने नियोजन करावे.

संपूर्ण देशासाठी लसीकरणाबाबत एकच धोरण असावे.
आम्ही ग्लोबल टेंडर काढल.
कोरोना लसीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपये एकरकमी देण्यास तयार असूनही कुठलीही लस उत्पादक कंपनी आमच्यासोबत बोलायला तयार नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

…तरीही बायडन यांची भारताला 25 हजार कोटी डोस देण्याची तयारी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारतासाठी 25 हजार कोटी डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी बायडनविरोधात प्रचार केला होता.
नमस्ते ट्रम्प म्हणून या देशात ट्रम्प यांना आणले.
विरोधात प्रचार केला तरीही भारताला लस दिली, असा टोलाही मुश्रीफांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

Also Read:- 

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

Related Posts