IMPIMP

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

by pranjalishirish
high level inquiry committee set up in parambir singh letter case retired justice kailas uttamchand chandiwal to probe

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh  यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अखेर महाविकास आघाडी सरकारने चौकशी समितीची घोषणा केली आहे. ही समिती पुढील सहा महिन्यात अहवाल देणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाला यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह Parambir Singh  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 20 मार्च 2021 रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र लिहिले. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का, यासंदर्भात ही समिती चौकशी करणार आहे.

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या तथाकथित महातीच्या आधारे परमबीर सिंह Parambir Singh  यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा केल्याचे निष्पन्न होते का ? याची चौकशी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे तसे असल्यास लाचलुचपत प्रतिंबंधक विभागामार्फत किंवा इतर तपास यंत्रणांमार्फत ते तपासले जाण्याची शक्यता आहे का, या बाबत ही समिती निर्णय घेणार आहे. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

परमबीर सिंह यांनी काय केले आरोप ?

परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी देशमुख  Anil Deshmukh पैशांची मागणी करतात, तपासकार्यात हस्तक्षेप असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. यासाठी त्यांनी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुल्का यांचा अहवाल, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना दर महिन्यला 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणचा दाखला दिला आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

Related Posts