IMPIMP

वरिष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा ‘आहेर’, म्हणाले- ‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’

by sikandershaikh
modi-saha

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य तसंच वरिष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार (shanta kumar) यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवर टीका करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय अशी टीका करत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या निज पथ का अविचल पंथी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले शांता कुमार ?

यावेळी बोलताना शांता कुमार म्हणाले, भारतीय जनता पक्ष राजकीय प्रदूषणाला बळी पडत आहे. ही केवळ सुरुवात आहे. माझ्यासारख्या काही जणांना या राजकीय प्रदूषणाचा अतिशय त्रास होत आहे. आम्ही काम केलेला आणि वाढवलेला हाच भाजप आहे का असं अनेकदा मनात येतं असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवरून निशाणा साधला आहे.

‘आपल्या सिद्धांताशी तडजोड करता कामा नये’

आपल्या सिद्धांताशी तडजोड करता कामा नये. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात भाजप हा आशेचा शेवटचा किरण आहे. भारतातील संपूर्ण राजकारण भरकटून दिशाहिन झालं आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी, विरोधकांना कमीपणा आणण्यासाठी दंगली घडवल्या जातात.
नेत्यांची खरेदी विक्री केली जाते. आणखी नेमके राजकारण काय काय सुरू आहे याचा नेम नाही.
संपूर्ण देशात भ्रष्ट राजकारण सुरू असताना भाजपच केवळ शेवटचा आशेचा किरण असल्याचं मत त्यांनी आपल्या पुस्तकात मांडलं आहे.

‘संघाचं मार्गदर्शन कमी होऊ लागलंय’

शांता कुमार यांनी सांगितलं की, एक काळ होता, जेव्हा राष्ट्री स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भाजपची धोरणं आणि सिद्धांत यावर लक्ष ठेवून असायचे.
भाजपनं सिद्धांताशी तडजोड करू नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करायचे.
मात्र हळूहळू संघाचं मार्गदर्शन कमी होऊ लागलं आहे.
एकूण परिस्थिती पाहता अतिशय चिंता वाटते असंही ते म्हणाले.

‘मोदींच्या रुपानं देशाला कुशल नेतृत्व लाभलं’

शांता कुमार (shanta kumar) म्हणतात, भाजपनं 2014 मध्ये प्रथमच ऐतिहासिक विजय प्राप्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपानं देशाला कुशल नेतृत्व लाभलं.
देशानं अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असं सांगत त्यानी पीएम मोदींचं कौतुक केलं.

Related Posts