IMPIMP

‘दूध का दूध, पानी का पानी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

by pranjalishirish
home minister anil deshmukh tweet on thackeray government investigated by retired judges allegations by parambir singh

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं राज्यासह दिल्लीतही वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. या सगळ्यानंतर आता राज्य सरकारनं त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमुर्तींमार्फत आता त्यांची चौकशी होणार आहे. अशात आता अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी करावं असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’

राज्य शासनानं आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी ट्विट करत लिहिलं की, मी माननीय मुख्यमंत्री महोहय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याची चौकशी लावून दूध का दूध, पाणी का पाणी करावं अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर मी त्याचं स्वागत करीन. सत्यमेव जयते असं देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

लवकरच चौकशी आयोगाची नियुक्ती

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे लिक होणं याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांची निवृत्त न्यायमुर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यासाठी लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार आहे अशी माहिती आहे.

Also Read : 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

‘सत्य जरा जास्त टोचतं’ अमृता फडणवीसांवर भाई जगतापांचा पलटवार

Related Posts