मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसुख हिरेन प्रकरणावरून ठाकरे सरकार अडचणीत आले असताना आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. Paramvir Singh नुकतीच बदली करण्यात आलेले माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या संदर्भात एक पत्र वायरल झाले आहे. या पत्रातील सातव्या मुद्द्यानुसार गृहमंत्र्यांनी वाझे आणि परमवीर सिंह यांना महिन्यांच टार्गेट दिलं होतं. हे कथित पत्र व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
RSS मध्ये मोठा बदल ! भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रेय होसबोले, जाणून घ्या नवीन सरकार्यवाह यांच्याबाबत
या सर्व प्रकरणामुळे भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीसुद्धा ट्विटरद्वारे ठाकरे सरकारवर टीका केली आहे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वाझे हे ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा आरोप केला आहे.
वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल करत त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेसमोर येऊन दरमहा १०० कोटीच्या वसुलीचा खुलासा करावा. वाझे हा ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा मा. @Dev_Fadnavis यांचा आरोप आता सिद्ध झाला आहे. pic.twitter.com/KKXu3oxI5y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
…म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं म्हणत रोहित पवारांनी साधला जावडेकरांवर ‘निशाणा’
तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग Paramvir Singh यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. या पत्रानंतर भाजप आक्रमक झाली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री वाझेची पाठराखण करीत असल्याचा आरोप केला आहे. परमवीर सिंह यांच्या खळबळजनक पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून हे आरोप खोटे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या पत्रानंतर गृहमंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र अद्याप परमवीर सिंह Paramvir Singh यांनी माध्यमांना अजून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे.
मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल
Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या
शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’
Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण
…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय
‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !