IMPIMP

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच चाकोंचे काँग्रेसवर टीकास्त्र; म्हणाले – ‘विरोधकांमध्ये एकजूट गरजेची, पण काँग्रेसमध्ये…’

by bali123
I don't see that initiative in the party which I was a member of earlier: PC Chacko, NCP

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते पी. सी. चाको PC Chaco यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ‘सध्या विरोधकांमध्ये एकजूट गरजेची आहे. पण मी यापूर्वी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात हे पाहिले नाही’, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली, असा आरोप पी. सी. चाको यांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना केला होता. चाको यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी चाको यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. ‘काँग्रेसमध्ये आता लोकशाही उरलेली नाही. निवडणुकीच्या मैदानात उतरवल्या गेलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत राष्ट्रीय काँग्रेस कमिटीशी कोणतीही चर्चा झालेली नाही’, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पी. सी. चाको PC Chaco हे पक्ष सोडून गेलेले दुसरे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिले.
NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts