IMPIMP

Income Tax Department Raid | अजित पवारांना मोठा धक्का ! मुलगा पार्थ यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

by nagesh
Income Tax Faceless Scheme | income tax faceless scheme lend transparency to the process of assessments and appeals under the income tax

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिंरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा (Income Tax Department Raid) टाकल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज सकाळपासून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे (Income Tax Department Raid) टाकण्यात येत आहेत. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट (Nariman Point) येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज सकाळपासून अजित पवार आयकर विभागाच्या रडावर आहेत.
पार्थ पवार यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यापूर्वी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.
त्यापैकी एक बहीण कोल्हापूर तर दोन बहिणी पुण्यात (Pune) वास्तव्यास आहेत.
यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावर विभागाची छापेमारी सुरु आहे.
आयकर विभागाने काही साखर कारखान्यांवर छापे (Income Tax Department Raid) टाकले असून हे कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तींयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारखान्याच्या संचालकांच्या घरावर छापे

राज्यातील दौंड शुगर (Daund Sugar), अंबालिका शुगर्स (Ambalika Sugar), जरंडेश्वर (Jarandeshwar), पुष्पगनतेश्वर (Pushpaganteshwar), नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या (factory directors) घरावर आयकर विभागाने छापे टाकले.
या सर्व कारखान्यांचे संचालक अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली.

काय म्हणाले अजित पवार ?

माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. त्यांचा कोणत्याही कंपन्यांशीही संबंध नाही. त्या लग्न करुन त्यांच्या त्यांच्या घरी सुखात संसार करत आहेत.
तरी माझ्याशी नातं असल्याने त्यांच्या घरावर छापे मारले याचे वाईट वाटतं. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे आयकर वेळच्या वेळी भरले जातात.
त्याची मी स्वत: काळजी घेत असतो. कोणताही कर चुकवत नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

माझ्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आणि माझ्या बहिणींच्या घरावर टाकलेले छापे हे राजकीय हेतूनं टाकली इतर कोणत्या हेतूनं ते आयकर विभागालाच विचारा,
अस पवार यांनी म्हटले. तसेच आजवर एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण कधी पहायला मिळालं नव्हतं.
महाराष्ट्रात सत्तेचा गैरपावर कधीच पाहायला मिळाला नाही.
पण ते काही सुरु आहे ते जनता बघत आहे, असंही पवार म्हणाले.

Web Title : Income Tax Department Raid | Big shock to Ajit Pawar! Income tax department raids son Parth’s Mumbai office

हे देखील वाचा :

ITR filing | SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! आता मोफत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्यात 11 % वाढ

Aryan Khan Drugs Case | NCB सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी सराईत गुन्हेगार ! पुण्यासह 3 ठिकाणी गुन्हे दाखल

Related Posts