IMPIMP

Income Tax Department | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निकटवर्तीय अधिकारी आयकर विभागाच्या ‘रडार’वर

by bali123
Income Tax Department | uddhav thackerays closest official ajoy mehta income tax radar action may be taken

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Income Tax Department । मागील काही दिवसापासून सक्तवसुली संचालनालय (enforcement directorate) राज्यात ठाण मांडून आहेत. गेल्या वर्षांपासून ED, CBI यांच्या कारवाईमुळे राज्यातील राजकीय समीकरण ढवळू लागले आहेत. महाराष्ट्रातील काही मंत्री विविध प्रकरणात सध्या ईडीच्या रडारवर आहे. तर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) हे आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आले आहेत. मेहता यांच्या मुंबईच्या नरिमन पॉईंट (nariman point) येथील फ्लॅटशी संबंधित व्यवहाराचा आयकर विभागाकडून बेनामी संपत्तीच्या अंतर्गत तपास केला जातोय. मेहता याना फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र भू संपत्ती नियामक प्राधिकरण (महारेराचे) maharera अध्यक्ष करण्यात आले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आयकर विभागाकडून (Income Tax Department) एका केसचा खुलासा झाला आहे. ज्यात मुंबईच्या नरिमन पॉईंटमध्ये (Nariman Point) एका मालमत्तेचा व्यवहार झाला होता. हा व्यवहार एक शेल कंपनी आणि एका निवृत्त अधिकाऱ्यामध्ये झाला होता. तर, अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. तो शेल कंपनी अनामित्रा प्रॉपर्टी प्रायवेट लिमिटेड कडून खरेदी केला होता. तसेच, या कंपनीचे 2 शेअर धारक आहेत ते मुंबईतील चाळीत वास्तव्यास आहेत. दरम्यान, ही कंपनी फक्त हा व्यवहार करण्यासाठीच सुरू करण्यात आली होती. यामुळे आयकर विभागाचा संशय याकडे गेला.

या कंपनीच्या ताळेबंदमध्ये अनेक त्रुटी आहेत. तसेच शेअर धारक सुद्धा नॉन फायलर आहेत. यात प्राप्तिकर विभागाला (Income Tax Department) संशय निर्माण झाला आहे. तर मेहता यांनी मागील वर्षी 1076 स्वेअर फूटचा हा फ्लॅट 5.33 कोटी रुपयांना खरेदी केला होता. ही मालमत्ता 2009 मध्ये अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडे होती. तेव्हा त्याचा दर 4 कोटी रुपये इतका होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, कंपनीचे शेअर धारक (Shareholder) कमेश नथुनी सिंह (Kamesh Nathuni
Singh) यांच्याकडे कंपनीचे 99 टक्के शेअर आहेत. त्यांचा पत्ता ओबेरॉय मॉलजवळ असल्याचे
समजते. तर दुसरे शेअर धारक (Shareholder) दीपेश रविंद्र सिंह (Deepesh Ravindra
Singh) आहेत. त्यांनी फक्त एक रिटर्न भरलाय. त्यात त्यांनी आपलं उत्पन्न 1, 71, 002 एवढे
दाखवले आहे. म्हणून कंपनीचे शेअर धारक ते लोक दिसत आहेत. ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि
एवढी मालमत्ता जवळ बाळगणे त्यांच्यासाठी कठीण दिसते.

या दरम्यान, यावरून मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता (Ajoy Mehta) यांनी म्हटलं आहे की,
या मालमत्तेच्या मालकाची माहिती माझ्याकडे असण्याचे काहीच औचित्य नाही आहे. हा एक कायदेशीर व्यवहार होता. तो योग्य पद्धतीने केला गेला. तसेच मी बाजारभावानुसार त्याची रक्कमही जमा केली आहे. अशा परिस्थितीत ही सर्व माहिती कुठून येत आहे हे मला माहिती नसल्याचं मेहता यांनी सांगितलं आहे.

Web Titel : Income Tax Department | uddhav thackerays closest official ajoy mehta income tax radar action may be taken

Related Posts

Leave a Comment