IMPIMP

‘ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे महावसुली सरकारच्या अनास्थेतून’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल (व्हिडीओ)

by pranjalishirish
is the life of the people worthless for you bjps question to Keshav Upadhye thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. सोमवारी वसई-विरार शहरामध्ये 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन मिळाला नसल्याने झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामध्ये नालासोपारा येथील विनायक हॉस्पिटलमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या घटनेला कोण जबाबदार आहे ? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का ? असा सवाल भाजपने विचारला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये Keshav Upadhye  यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

केशव उपाध्ये Keshav Upadhye म्हणाले, एकीकडे राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले आहे. तर तिसरीकडे ज्या ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवटा निर्माण झाला आहे. काल (सोमवार) 11 लोकांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे, अस्वस्थ करणारं आहे. भाजपचा असा आरोप आहे, हे कोरोनाचे जे बळी काल ऑक्सिजन अभावी गेलेत हे राज्य सरकारच्या अनास्थेपाई, राज्यातील महावसूली सरकारच्या अनास्थेतून, दुर्लक्षातून व हेळसांडपणातून गेलेले हे बळी आहे. अजून किती बळी या सरकारला पाहिजे ? असा संतप्त सवाल केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी विचारला आहे.

‘या’ कारणामुळं मोदींनी Lockdown लावला होता, आशिष शेलारांनी दिलं महाविकासला प्रत्युत्तर

मुख्यमंत्री या प्रकरणावर बोलतील का ? भाजपचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे ? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का ? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का ? राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसिवीरचा काळा बाजार तर कुठे व्हेंटिलेटरसाठी आरोग्य अधिकारीच लाच घेत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या मते सर्व अलबेल आहे, असे ट्विट महाराष्ट्र भाजपने केले आहे.

Read More : 

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts