IMPIMP

Jan Ashirwad Yatra | उन्होंने हवा कर दी सर ! जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बड्या नेत्याचा ‘कॉल’, बातचीत व्हायरल

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन Jan Ashirwad Yatra | भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) सध्या जन आशीर्वाद यात्रेसाठी (Jan Ashirwad Yatra) सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे आहेत. तत्पूर्वी मागील काही काही दिवसात घडलेल्या नाट्य घडामोडीत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षात वाद उफाळला होता. नारायण राणेंना झालेली अटक त्यानंतर त्यांची झालेली सुटका यावरून राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. अटकेदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंना एका वरिष्ठ नेत्याचा फोन आल्याचे समजते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सिंधुदुर्ग अर्थात त्यांच्या बालेकिल्ल्यात आहेत. या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Union Defense Minister Rajnath Singh) यांचा राणेंना फोन (Phone) आला. त्यावेळी नारायण राणे हे व्यासपीठावर होते. राजनाथ सिंह यांनी नारायण राणेंच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. राणे व्यासपीठावर असल्याने त्या ठिकाणी मीडियाचे कॅमेरे होते. म्हणून राजनाथ सिंह आणि नारायण राणे यांच्यातला संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नारायण राणेंना (Narayan Rane) अटक करतेवेळी त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती.
त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास झाला.
यांनंतर लगेच नारायण राणे हे शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रेत पून्हा उतरले.
आज राणेंना प्रकृतीबाबत राजनाथ सिंह यांनी कॉल करून विचारणा केली.
त्यावेळी आपली प्रकृती अतिशय उत्तम असल्याचं राणेंनी सिंह यांना सांगितल.
‘माझी तब्येत आता चांगली आहे. मी रुग्णालयात अ‍ॅडमिट नव्हतो.
मी रुग्णालयात गेलोच नाही. यात्रा पुन्हा सुरू झालीय. आताही मी यात्रेतच आहे.
तब्येत बरी नसल्याची हवा त्यांनी केली होती, असे नारायण राणेंनी सिंह यांना सांगितलं.
प्रकृतीची विचारपूस केल्याबाबत राणेंनी सिंह यांचे आभारही मानले आहे.

Web Title : Jan Ashirwad Yatra | union minister rajnath singh calls bjp leader narayan rane ask him about health

हे देखील वाचा :

Covid-19 Protocol | सणासुदीचे दिवस पाहता केंद्र सरकार सतर्क ! देशभरात 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला कोरोना ‘प्रोटोकॉल’चा कालावधी

Rain in Maharashtra | उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार; 30 ऑगस्टला ‘या’ जिल्ह्यात Alert

Earn Money | लवकरच सुरू करा ‘हे’ काम, वर्षाला 30 लाखाच्या कमाईची शक्यता; जाणून घ्या सोपी पध्दत

Related Posts