IMPIMP

Jayant patil | अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत

by nagesh
Ajit Pawar And Jayant Patil | cold war between ncp leader ajit pawar and jayant patil is at peak in sangali district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Jayant patil | मागील काही दिवसांत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) बारामती दौरा केला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन लक्ष केले होते. त्यातच आज (गुरुवारी) पवार यांच्या संबधित कंपन्यावर आयकर विभागाने छापेमारी (Income tax department raids) केली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) लपवण्यासारखं काहीच करत नाहीत. त्यामुळे काही लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
त्यावेळी बोलताना पाटील (Jayant Patil) म्हणाले की, अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे?
अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही.
ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहित नाही.
बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की. आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी विचारल्यावर सर्व कारखाने त्यांना माहिती देऊ शकले असते.
पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची. एकाच वेळी धाड टाकायची, पहाटे धाड टाकायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
तर, सरकार जाण्याचा प्रश्न संपलेला आहे. सरकार जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे.
त्यामुळेच रेड टाकणं आणि एजन्सीचा गैरवापर करणे हा उद्योग सुरू झाला असल्याचा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे.

Web Title : jayant patil | ajit pawar never hide anything jayant patil after it raid in maharashtra

हे देखील वाचा :

Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महोत्सव प्रारंभ ! बागुल कुटुंबीयांतर्फे घटस्थापने दरम्यान लक्ष्मीमातेस 25 किलोची चांदीची साडी अर्पण

Navratri Utsav 2021 | नवरात्री उत्सवानिमित्त PM नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा !

Lakhimpur Kheri Video | लखीमपूर खेरी घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर; मंत्र्याच्या भरधाव SUV नं शेतकऱ्यांना चिरडलं

Related Posts