IMPIMP

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

by Team Deccan Express
jayant patil bjps plot overthrow government who leader sachin vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अनिल देशमुख आणि राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वेच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांना दणका बसला आहे. यातच सचिन वाझे sachin vaze यांनी पत्र लिहून अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

सचिन वाझे sachin vaze यांनी अनिल परब यांचे नाव घेतल्यानंतर विरोधकांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मूळ प्रकरण हे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ ठेवली कोणी, दुसरं, मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण. पण हे तिसरीकडेच जात आहेत. त्यात देखील ज्या व्यक्तीवर गंभीर प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे, त्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी आता काय राहिलंय?’, चंद्रकांत पाटलांचा टोला

जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा हा भाजपचा डाव आहे. भाजप ज्या प्रमाणे बोलते तशीच चौकशी एनआयए कडून होत आहे, असे म्हणत जयंत पाटील म्हणाले सचिन वाझे याचा म्होरक्या कोण ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच भ्रष्टाचार होत असेल तर सात दिवसांच्या आत तक्रार केली पाहिजे. पण आता काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून बोलत आहेत. लोकांचं लक्ष विचलित ठेवून नको त्या चर्चा घडवून आणणे हा प्रकार सध्या सुरु आहे, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळल्याने राज्य सरकारवर चौकशीची नामुष्की ओढावली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत 6 एप्रिल रोजी सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती.

Read More : 

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts