IMPIMP

फडणवीसांच्या भूमिकेचे आव्हाडांकडून कौतुक, म्हणाले -‘प्रशंसनीय भूमिका… एकमेकास सहाय्य करु या’

by pranjalishirish
jitendra awhad praises devendra fadnavis after his support for state governments stand on increasing cases of coronavirus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची रविवारी बैठक झाली. या बैठकीत राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा आढवा घेण्यात आला. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार रात्री 8 पासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असणार आहे. तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने घेतेल्या या निर्णयासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांनी पत्रकार परिषद घेऊन सहकार्य करण्याचे जाहिर केले.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्य सरकारला आमचे सहकार्य राहील. कोरोनाची भायवह परिस्थिती पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीही सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले आहे.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

फडणवीस यांनी म्हटले की, सरकारने कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत चर्चा करायला हवी व राज्यात प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत विवेचन करायला हवं, असा सल्ला दिला. राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे लक्षात येत आहे. यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार-रविवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध अशा प्रकारचे निर्णय घेतल्याचे लक्षात आले. आम्ही जनतेला आवाहन करतो की, या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावे. भाजप कार्यकर्त्यांनीही सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल, त्या दृष्टीने लसीकरण मोहीमेत भाजप कार्यकर्त्यांनी सक्रियतेने सहभागी व्हावे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांचे कौतुक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये राज्य सरकारला सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच कोरोनाचं संकट वाढतंय.. एकमेकास सहाय्य करु असंही आव्हाड यांनी म्हटले आहे. प्रशंसनीय भूमिका… कोरोनाचं संकट वाढत आहे… एकमेकास सहाय्य करु या… असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटमध्ये फडणवीस यांना टॅग केले आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

Related Posts