IMPIMP

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

by pranjalishirish
kangana ranaut gets brutally trolled calling maharashtra govt changu mangu gang

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : सतत काहीना काही वादग्रस्त वक्तव्ये करून अभिनेत्री कंगना राणावत  Kangana Ranaut नेहमी चर्चेत राहत असते. यापूर्वी तिने अभिनेता सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने राज्य सरकारवर टीका केली आहे. आता तिने महाराष्ट्र सरकारचा उल्लेख ‘चंगू मंगू गँग’ म्हणून केला आहे. त्यामुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर आता राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरून कंगना राणावत Kangana Ranaut हिने सरकारला धारेवर धरले आहे. कंगणाने ट्विट करून म्हटले, की ‘महाराष्ट्रात लॉकडाऊन लागले का, कोणी मला सांगू शकेल का? हे सेमी लॉकडाऊन आहे की खोटा लॉकडाऊन? काय सुरु आहे इथे? कदाचित कोणीच कठोर निर्णय घेऊ इच्छित नाही. डोक्यावर तलवार लटकत असताना चंगू मंगू गँग आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आपण राहू की नाही, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे’.

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

https://twitter.com/_RubyShines/status/1381590520216965129

दरम्यान, कंगनाच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सने ट्विटवरून तिला ट्रोल केले आहे. ‘तू काही काळजी करू नकोस. तू तुझ्या घरीच राहा. ते निर्णय घेतील. गरीब घटकाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्या दृष्टीने ते विचार करत आहे. तू काळजी करू नकोस.’ तसेच महाराष्ट्राचे माहीत नाही, पण कंगनाचा मेंदू पूर्ण लॉकडाऊन झाला आहे, अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केले.

Read More : 

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts