IMPIMP

Karuna Sharma | …म्हणून करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

by nagesh
Karuna Sharma Munde | mhada houses for mla in mumbai karuna sharma munde slams maha vikas aghadi government

अंबाजोगाई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Karuna Sharma | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात परळीत पत्रकार परिषदेत बोलण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma) यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली अटक (Arrested) करुन न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली. यांनतर त्यांनी जामीनासाठी (Bail) याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयात वीस अर्ज होते. म्हणून वेळेमुळे आज सुनावणी झाली नाही. यामुळे आता करुणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर (Judge S. S. Sapatnekar) यांच्या टेबलवर आज (शनिवारी) जामिनासाठी 20 अर्ज आले होते. दरम्यान, करुणा शर्मांचा अर्ज 20 नंबर असल्याने जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. उद्या रविवार न्यायालयीन कामकाजास सुट्टी असल्याने आता सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या कारणामुळे करुणा शर्माचा कोठडीतील मुक्काम अजून वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. मात्र, याठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक (Arrested) झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. करुणा शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी शनिवारी होती, आता ती सुनावणी सोमवारी होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Karuna Sharma | karuna sharma bail application is pending in court, court give next date

हे देखील वाचा :

Pune Vasundhara Project | 107 एकरवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प प्रशासनाकडून मान्य, स्थायी समितीला सादर

Pune Crime | अंघोळ करण्यासाठी गेलेले 2 तरुण नदीत बुडाले

GST Council | जीएसटी कौन्सिलचा निर्णय ! 1 जानेवारीपासून मंथली GST रिटर्न दाखल न केल्यास जमा करू शकणार नाही GSTR-1

Mild Products | आंघोळ करताना साबणाच्या फेसाने घेतला पेट, 4 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी; स्वस्त साबणाचा परिणाम

Related Posts