IMPIMP

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

by bali123
Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya reveal one more scam of cm uddhav thackeray brother in law shridhar patankar shreeji homes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख या मंत्र्यानंतर आता शिवसेनेचे shivsena नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण परब यांनी अनधिकृत म्हाडाची जागा बळकावल्याच्या आरोपातून त्यांच्याविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘शिवसेना shivsena मंत्री अनिल परब यांनी सरकार/म्हाडाची जागा बळकाविणे व अनधिकृत बांधकाम करणे, त्या विरोधात मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे’. तसेच अनिल परब यांनी म्हाडाची जागा अनधिकृतपणे बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

दरम्यान, भाजपकडून विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह इतर काही नेतेमंडळींकडून टीका केली जात आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी यापूर्वी शिवसेना shivsena  नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

Related Posts