IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले – ‘…तर रॉयल्टी म्हणून त्यांना 200 ते 300 कोटी सहज मिळतील’

by nagesh
Kirit Somaiya | Shiv Sena city president Sanjay More and 9 others arrested, will be produced in court today, says senior police inspector Anita More of shivaji nagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पवार कुटुंबियांच्या 57 कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची (Income Tax Department) सुरु असलेली देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. महारष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे आणि पवारांचं सरकार घोटाळेबाज असून अजित पवारांच्या घोटाळ्यावर वेबसिरीज (web series) काढायची असेल तर त्यांना 200 ते 300 कोटीची रॉयल्टी (Royalty) मिळेल असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पवारांवर चौफेर टीका केली. तसेच भिंतीत, बेसमेंट आणि मोकळ्या जागेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काय काय सापडले आहे ते लवकरच कळेल, असेही सोमय्या म्हणाले.

https://fb.watch/8CxbOVBx0o/

किरीट समय्या (Kirit Somaiya) म्हणाले, अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा (Pawar family) हिशोब मी आज मांडणार आहे.
जरंडेश्वर आणि इतर कारख्यान्यात (Jarandeshwar Sugar Factory) कोणकोण भागीदार आहेत ते मी आज सांगणार आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे हे न्यायालयानेही सांगितले.
या कारखान्यात अजित पवार सर्वेसर्वा होते. अजित पवार यांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली आणि स्वत: तो इतर कंपनीच्या माध्यमातून विकत घेतला.
हे सगळं करताना त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ज्या बेनामी कंपनीने हा कारखाना विकत घेतला, त्यांचे संचालक विजया पाटील (Vijaya Patil), त्यांचे पती मोहन पाटील (Mohan Patil), दुसऱ्या आहेत निता पाटील (Nita Patil) या अजित पवारांच्या बहिणी (Sister) आहे.
त्यामुळे संबंध नसताना बहिणींच्या कार्यालयावर छापे टाकल्याचा अजित पवारांचा दावा खोटा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
आपल्या नावे बेनामी मालमत्ता खरेदी करण्यात आली, याची माहिती अजित पवारांच्या बहिणींना नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नीता पाटील, विजया पाटील, मोहन पाटील यांची कल्पतरु ही कंपनी आहे. याची गुंतवणूक अजित पवारांच्या कंपनीत आहे.
जरंडेश्वर कारखान्याचे 90 टक्के शेअर्स या ना त्या प्रकारे पवार कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित मंडळींचेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title : Kirit Somaiya | if web series released ajit pawars scam he will easily get rs 200 300 crore royalty (Video)

हे देखील वाचा :

PM Gati Shakti | ‘गतीशक्ती’ योजनेतून कसे होईल शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

Tata Motors च्या शेयरमध्ये 5 दिवसात 42% ची तेजी, आजच 20% वाढला; जाणून घ्या गुंतवणुकीची रणनिती

Sunayana Fozdar | तारक मेहता का उल्टा चश्मातील अंजली भाभीचे ग्लॅमरस ‘लाईफ’

Related Posts