IMPIMP

Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील पर्दाफाश करणार – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya on hasan mushrif home ed raid

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Kirit Somaiya | नुकतंच भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली. यामुळे सोमय्यांवर महाविकास आघाडीचे नेते, मंत्री जोरदार टीका करत आहेत. त्यातच आता किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा (Scam) उघडकीस आणला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात (Appasaheb Nalawade Sugar Factory) मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) मुश्रीफांवर जोरदार आरोप करत त्यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत.
आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? यासंबंधीचे पुरावे उद्या सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडे (Income Tax Department) देणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
तसेच या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचा दावा देखील सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत.
मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई आहे. मतिन हे या कंपनीचे मालक आहेत.
यातील 98 टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात 2 टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली, 2020 मध्ये कारखाना ब्रिक्स इंडियाकडे चालवण्यासाठी देण्यात आला.
तेव्हा सहकार मंत्रालयाने हा कारखाना दिला. असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

Web Title : Kirit Somaiya | kirit somaiya big revelation hasan mushrif second scam of rs 100 crore exposed

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

Related Posts