IMPIMP

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

by bali123
kolhapur satej patil role clear in gokul election

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघ या मलईदार संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या दोन दिवसांत जाहिर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला खिंडार पाडत अनेक संचालकांना विरोधी आघाडीत घेण्यात पालकमंत्री सतेज पाटली satej patil यांना यश आले आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला मोठा दणका बसला आहे. सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेश पाटील यड्रावकर व खासदार प्रशांत मंडलिक हे सारे मात्तबर मंडळी एकवटले आहेत. या नेते मंडळींनी आज (सोमवार) रा. शाहू शेतकरी आघाडीची घोषणा करुन हीच आघाडी सत्तेत येईल असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण…’

सतेज पाटील satej patil यांनी नवीन आघाडी केल्याने गोकुळच्या आखाड्यात आता सामना रंगणार हे निश्चत झाले असून राज्यातील सर्वात मोठ्या या सहकारी दूध संघावर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोकूळ दूध संघावर सध्या माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. महाडिक हे भाजपचे तर पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. त्यांच्या विरोधात सतेज पाटील यांनी आघाडी स्थापन करुन महाविकास आघाडीच्या मध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार असल्याची घोषणा केली.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

आघाडीची घोषणा करताना सतेज पाटील satej patil म्हणाले, दुधाला चार पैसे जादा दर मिळावा यासाठीच आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. भाजप वगळता इतर सर्व पक्ष आमच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती सोबत असल्याने आमची ताकद वाढली आहे. पुढील आठवड्यात जागा वाटप होईल असेही सतेज पाटील यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला निसटत्या पराभावाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी गटासाठी वजन वापरले होते.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

आमदार विनय कोरे यांनी सांगितले की, दूध संघाच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत. पण, राज्याच्या राजकारणात आम्ही भाजपचा घटक पक्ष म्हणून असू. गोकुळमध्ये चारवेळा आम्ही सत्ताधारी आघाडीविरोधात लढलो. आता आमच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे.

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

शाहू शेतकरी आघाडीतील नेते
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, जयश्री पाटील चुयेकर, जयवंत शिंपी, गोपाळराव पाटील, प्रताप माने.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

Related Posts