IMPIMP

शेवटची 15 मिनिटं… जयंत पाटलांचा एक ‘कॉल’ अन् भाजपाची ‘दाणादाण’, जाणून घ्या कसा होता राष्ट्रवादीचा गेम ?

by amol
jayant-patil

सांगली :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Jayant Patil | सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर भाजपला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryawanshi) यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर काँग्रेसचे उमेश पाटील (Unmesh Patil) यांची उपमहापौर म्हणून निवड झाली आहे. बहुमत असूनही या निडणुकीत भाजपचा पराभव झाला.

सांगली महापालिकेच्या निवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशात भाजपचे काही नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्यानं या निवडणुकीला आणखी रंग चढला होता. काँग्रेस राष्ट्रवादीत महपौर पदासाठी चुरस होती. निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली, तरीही उमेदवार ठरत नव्हता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशात अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा एक फोन आला आणि शेवटच्या क्षणी दिग्विजय सुर्यवंशी यांचं नाव निश्चित करण्यात आलं.

अवघे 15 मिनिटं शिल्लक असताना जयंत पाटील यांनी दूरध्वनी करून मैनुद्दीन बागवान आणि उत्तम साखळखर यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्यामुळं दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदासाठी वर्णी लागली. या निवडीनंतर कोल्हापुरातील एका हॉटेलात आघाडीचे नेते आणि नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी जल्लोष केला.

या निवडणुकीत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्यात आघाडील यश मिळालं.
भाजपची 6-7 मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं.
तर 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं आघाडीच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता.
राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या धीरज सु्र्यवंशी यांना 36 मतं मिळाली.
दिग्विजय सुर्यवंशी यांनी 3 मतांनी धीरज सु्र्यवंशी यांचा पराभव केला.
तर काँग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपच्या गजानन मगदुम यांना पराभव करत उपमहापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेतली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खास बात अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जातीनं
लक्ष घालत प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्या होम ग्राऊंडवर अखेर त्यांनी बाजी मारली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपची मदार होती.
परंतु चंद्रकांत पाटलांना गड राखूनही खुर्ची मिळवायला काही जमलं नाही.
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा जोरदार धक्का असल्याचंही बोललं जात आहे.

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत एकूण 78 जागा आहेत.
मंगळवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली.
महापालिकेत 78 पैकी सर्वाधिक म्हणजेच 41 जागा या भाजपकडे आहेत. काँग्रेसकडे 19 तर राष्ट्रवादीकडे 15 जागा आहेत.
तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांनी बाजी मारली. भाजपला धक्का देत राष्ट्रवादीनं विजय मिळवला.
बहुमत असूनही भाजपची 6-7 मतं फुटल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सोपा झाला.
कोरोनामुळं या निवडणुकीसाठीचं मतदान हे सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं झालं होतं.

Related Posts