IMPIMP

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

by bali123
Let the Corona crisis end! Chief Minister Uddhav Thackeray laid a wish at Panduranga

पंढरपूर न्यूज (Pandharpur News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Uddhav Thackeray | पंढरपूरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, भक्तीरसात, टाळ मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्या वेळी पांडुरंगच्या चरणी घातले. भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पहायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्रांचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून स्वत: गाडी चालवत सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला पोहचले. शासकीय विश्रामगृहात आगमन होताच काही वेळाने त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोरोनाविषयक आढावा घेऊन संभाव्य तिसर्‍या लाटेच्या दृष्टीने अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित आहे. आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे.
मात्र संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या.
नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या.

Web Title : Let the Corona crisis end! Chief Minister Uddhav Thackeray laid a wish at Panduranga

Related Posts