IMPIMP

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

by nagesh
Local Body Elections | congress will contest local body elections on its own Attention to the role of NCP and Shiv Sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Local Body Elections | पुढील तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होणार आहेत. या पार्श्वभुमीवर आपल्या पक्षांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु केली आहे. राज्यात काॅग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) मिळून तिन्ही पक्षांचे सरकार असले तरी आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या (Congress)
सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र दिले आहेत. त्यावेळी सर्व जिल्हा प्रभारींना आदेश दिले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी असूनही काँग्रेसने (Congress) पहिल्यांदा अधिकृत भूमिका जाहीर केल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनेक कार्यक्रमावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला होता.
तसेच. स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं देखील म्हटलं होतं.
यानूसार पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत काँग्रेसच्या सर्व
जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र देऊन भूमिका सांगितली आहे.
तसेच या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना देखील पत्रात देण्यात आल्या आहेत.

Web Title : Local Body Elections | congress will contest local body elections on its own Attention to the role of NCP and Shiv Sena

हे देखील वाचा :

PMGKAY | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 80 कोटी लोकांना पुढील वर्षी मार्चपर्यंत मिळेल 5 किलो मोफत रेशन

Mumbai Crime | धक्कादायक ! बांगलादेशातून 5 हजार मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात अडकवलं; अखेर आरोपीला अटक

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

Related Posts