IMPIMP

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

by pranjalishirish
lockdown in maharashtra kimbhmela 2021 huge crowd mumbai guardian minister aslam sheikh

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  Aslam Sheikh हे महाराष्ट्रातील लॉकडाउनबाबत माहिती देत असतानाच त्यांनी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे भरलेल्या महाकुंभमेळा बाबत भाष्य करताना त्यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोनारुग्णाची संख्या अधिक वाढत असताना अशा परिस्थितीत उत्तराखंड येथील हरिद्वार येथे महाकुंभमेळा होत असून, कुंभमेळा वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावरून अस्लम शेख यांनी भाष्य केले आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

अस्लम शेख Aslam Sheikh  बोलताना म्हणाले, आज जी राज्ये करोनासंदर्भात कामं करत नाहीत, कारण त्यांना वाटतंय की, राज्य बदनाम होईल. त्याची काय अवस्था होणार आहे. तर दुसरीकडे सरकार राजकारण करण्यासाठी कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रम घेत आहे. याचा विस्फोट होणार आहे. हे करोना रुग्ण किती मोठ्या संख्येनं निघणार याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतलेली आहे. असे त्यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटले आहे. तर आज महाराष्ट्र राज्यात अधिक रुग्ण आपल्याला दिसत आहेत. परंतु मी जबाबदारीने सांगतो की, महाराष्ट्रात चाचण्या केल्या जात आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे शेख म्हणाले. यादरम्यान, सर्वांच्या सूचना ऐकल्या. परप्रांतियांचं म्हणत असेल, तर त्याची दोन कारणं आहेत. पावसाळा सुरूवात झाल्यानंतर शेती करायला जातात. त्यांना त्रास होऊन नये म्हणूनच रेल्वे सेवा बंद केलेली नाही. कडक निर्बंध लागू करतानाही सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद केली नाही, असे ते म्हणाले.

‘या’ कारणामुळं मोदींनी Lockdown लावला होता, आशिष शेलारांनी दिलं महाविकासला प्रत्युत्तर

पुढे ते म्हणाले, जेव्हा हे परप्रांतीय मुंबईत येतील, परिणाम होईल. त्यामुळे त्याचाही विचार नव्या मार्गदर्शक सूची तयार करताना केला जाईल. कारण देशात भावूक होऊन काहीतरी करायचं सुरू आहे. इतर महाराष्ट्रात जे नेते आणि मंत्री वैज्ञानिकांचं ऐकायचं नाही, डॉक्टरांचं ऐकायचं नाही आणि स्वतः मनाने जे काही करत आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार आहे. तर मागच्या वर्षी लॉकडाउन केला तेव्हा केंद्र सरकारकडून अचानक आदेश देण्यात आले. त्यावेळी जर लोकांना एका दिवसाचा वेळ दिला असता किंवा मार्गदर्शक सूचना कडक केल्या असत्या. तर अशी बिकट स्थिती केंद्रामुळे झाली आहे. त्यावेळी केंद्राला का सूचलं नाही, मला माहिती नाही. मात्र, महाराष्ट्रात असं होता कामा नये म्हणून सरकार सर्व असोसिएशनबरोबर चर्चा करत आहे. असे अस्लम शेख Aslam Sheikh  यांनी म्हटले आहे.

Read More : 

Raju Shetti : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

‘ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे महावसुली सरकारच्या अनास्थेतून’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल (व्हिडीओ)

‘Facebook Live वर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आता तरी काही बोलतील का ?, भाजपचा सवाल

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts