IMPIMP

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

by bali123
lockdown or strict restrictions in maharashtra to be decided today in cabinet meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात मंगळवारी (दि. 23) 28 हजार 699 रुग्ण नव्याने आढळले असून तब्बल 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत आज (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन लॉकडाऊन lockdown लागू करायचा की कडक निर्बंध लागू करायचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच; गेल्या 24 तासांत 28,699 नवे रुग्ण, 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर येथे स्थानिक पातळीवर लॉकडाउन lockdown जाहीर केला आहे. मात्र, राज्यातील इतर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कदाचित राज्यात पुढील काळात वाढती संख्या पाहता लॉकडाउन पुन्हा एकदा जाहीर करण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील असेही टोपे यांनी म्हटले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Related Posts