IMPIMP

Maha Vikas Aghadi | लखीमपूर खेरी प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

by nagesh
maha vikas aghadi called statewide bandh october 11 against lakhimpur kheri violence incident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maha Vikas Aghadi | लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर (lakhimpur kheri violence incident) गाडी घातल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर उसळलेल्या दंग्यात भाजपचे (BJP) 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या मुलाला वाचवण्याचा आणि शेतकऱ्यांचे आंदोलन (farmers protest) दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maha Vikas Aghadi) हाक दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसची (Congress) आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक (Maha Vikas Aghadi called Statewide Bandh) दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून कसे प्रत्युत्तर येते, यावरुन बंद यशस्वी होणार की चिघळणार हे ठरणार आहे.

Web Title :- maha vikas aghadi called statewide bandh october 11 against lakhimpur kheri violence incident

हे देखील वाचा :

Vehicle Scrappage Policy | जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण करणं होणार महाग, द्यावे लागणार 8 पट जास्तीचे पैसे, जाणून घ्या

Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेमध्ये तब्बल 4103 जागांसाठी भरती, जाणून घ्या

PM Mitra पासून बोनसपर्यंतची घोषणा, जाणून घ्या कॅबिनेटच्या 2 मोठ्या निर्णयांबाबत

Related Posts