IMPIMP

Mahadev Jankar | महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले – ‘NDA असो किंवा UPA ओबीसींना न्याय हक्क मिळाला पाहिजे’

by bali123
mahadev jankar protest in mumbai for obc reservation said

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) जो पर्यंत ओबीसींना आरक्षण (obc reservation) मिळत नाही तोपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका (Election) होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Rashtriya Samaj Party leader Mahadev Jankar) यांनी दिला आहेत. तसेच एनडीए (NDA) असो की यूपीए (UPA) ओबीसींना (OBC) पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, असा घरचा आहेर जानकरांनी भाजपला (BJP) दिला आहे. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी (obc reservation) जोरदार निदर्शने (protest) करण्यात आली. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर टीका केल्याने चर्चांना उधाण आले आहे. mahadev jankar protest in mumbai for obc reservation said

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही

महादेव जनकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये (protest) रासपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मानखुर्द (Mankhurd) येथे चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन (obc reservation) भाजपला देखील दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींचं (OBC) स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण (reservation) रद्द केलं. त्यामुळे ओबीसींना आरक्षण (obc reservation) मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ओबीसी आरक्षण (obc reservation) मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका (Election) होऊ देणार नाही, असा इशारा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा

यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना (Caste wise census of OBC) करण्याची मागणी केली. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे. याशिवाय ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक (Economic and social) भागीदारी मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एनडीए असो की यूपीए दोघांनी ओबीसींना पाहिजे तसा हक्क दिला नाही, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. रासपनं आज राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं.

Web Title : mahadev jankar protest in mumbai for obc reservation said

Related Posts